अध्यक्षांचे मनोगत

रिझर्व बँकेच्या नवनवीन धोरणानुसार बँकेच्या कार्यप्रणालीमध्ये सुद्धा आमुलाग्र बदल झालेला आहे. बँकेचा कारभार सचोटीने व काटकसरीने चालवून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निव्वळ नफा रू. 50 लाखाचे वर नियमित आहे. बँकेचे या वर्षीचे नेट एन.पी.ए.चे प्रमाण 5.28% आहे. स्पर्धात्मक युगात सभासदांना व ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. त्याप्रमाणे बँकेने नॅशनल क्लिअरिंग सेंटर, रिझर्व बँक ऑफ इंडिया, मुंबई यांचेकडुन स्पेशल मायकर कोड नंबर घेऊन मायकर चेकची सुविधा खातेदारांचे नाव व खातेनंबर टाकून कार्यान्वित केलेली आहे. तसेच बँकेने आयएफएससी कोड घेतला असून त्याद्वारे आपणास आरटीजीएस/एनईएफटीद्वारे फंडस् आपल्या खात्यात वर्ग करून घेता येतील व त्यांच्या बाहेरुन येणार्‍या आपल्या बँकेतील रकमा संबंधितांच्या खात्यात जमा करता येतील,त्याचा ग्राहकांनी जास्तीतजास्त लाभ घ्यावा.
बँकेकडे लॉकरची सुविधा उपलब्ध असावी अशी ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता बँकेने नवीन लॉकर रूम तयार केलेला असून सभासद व ग्राहकांसाठी जास्तीतजास्त लॉकर उपलब्ध करून दिलेले आहेत. तरी ग्राहकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लॉकरची सुविधाही घ्यावी. सध्याच्या परिस्थितीत चांगला कर्जदार मिळणे अतिशय अवघड आहे. अशा परिस्थितीत बँकेने सभासदांसाठी मागील वर्षी पासून गृहकर्ज योजना सुरू केलेली आहे. तरी इच्छुक सभासदांनी आपल्या बँकेतुनच गृहकर्ज घ्यावे व इतरांनाही गृहकर्ज घेण्यासाठी सूचीत करावे अशी मी सर्वांना विनंती करतो.
रिझर्व बँक व सहकार खात्यामार्फत तसेच फेडरेशन व असोसिएशनमार्फत घेण्यात येणारे विविध विषयांवरील प्रशिक्षण बँकेतील कर्मचार्‍यांना व संचालकांना देण्यावर संचालक मंडळाने भर दिलेला आहे. या वर्षीपासून सभासदांना बँकिंग संदर्भातील शिक्षण व प्रशिक्षण देण्याबाबत संचालक मंडळ योग्य नियोजन करीत असून तशी सर्व सभासदांसाठी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करीत आहोत. आपल्या बँकेची त्र्यंबकेश्‍वर येथे दुसरी शाखा असून तिसरी शाखा गोंदे (दुमाला) येथे दि. 30/11/2015 पासून कार्यान्वित झाली असून खातेदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढचे शाखा प्रगतीचे नाशिककडे असणार आहे यात दुमत नाही. बँकेने एसएमएसची सुविधा सुरू केल्याने ज्यांनी मोबाईल नंबर बँकेत दिले नसतील त्यांनी ते द्यावेत म्हणजे त्यांनी त्यांच्या आर्थिक स्थितीव्यवहारांच्या नोंदीची माहिती मिळेल.
बँकेस आपल्या अनमोल सहकार्याने सन 2011-12 या वर्षात महाराष्ट्र फेडरेशन, मुंबई, सन 2012-13 महाराष्ट्र स्टेट असोसिएशन व नाशिक जिल्हा बँकस् असोसिएशन यांचा सन 2013-14 बँको तर्फे तसेच महाराष्ट्र फेडरेशन, मुंबई चा सन 201415 असे एकूण पाच पुरस्कार मिळालेले आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. यापुढील काळात सर्वांचे असेच बहुमोल सहकार्य लाभेल असा विश्‍वास व्यक्त करतो व मी माझे मनोगत संपवितो.