गुंतवणूक

बँकेने वर्षअखेरीस रू. 1641.21 लाख ची गुंतवणूक आहे. मागील वर्षापेक्षा रू. 369.76 लाखाने वाढ झालेली असून बँकींग नियमन कायदा 1949 (सहकारी बँकेला लागू असणारे) च्या कलम 18 व 24 अन्वये रोख निधी व तरलतेचे प्रमाण वर्षभर सातत्याने राखलेले आहे. तसेच बँकेने सरकारी रोख्यात दिनांक 31 मार्च 2016 अखेर रुपये 816.89 लाखांची गुंतवणूक केलेली आहे. उर्वरित गुंतवणूक ताळेबंदात नमुदित विविध बँकेत मुदतठेवी द्वारे केलेली आहे.

नफा वाटणी

आर्थिक स्थितीवर्ष 2015-16 मध्ये बँकेस कर्जावरील व गुंतवणूकीपासून मिळालेले व्याज, कमिशन व अन्य स्वरूपातील उत्पन्न असे एकूण रू. 387.85 लाख उत्पन्न मिळाले असून ठेवीवर दिलेले व्याज व प्रशासकीय खर्चासह एकूण रू. 307.78 लाख खर्च झालेला आहे. सदरचा खर्च वजा जाता बँकेस रू. 80.07 लाख इतका ढोबळ नफा झालेला आहे. त्यातून रू. 20 लाख आयकर व रू. 3.10 लाखाच्या इतर तरतूदी, वजा जाता बँकेस या वर्षी रू. 56.97 लाख इतका निव्वळ नफा झालेला आहे. सदर नफ्याचा विनियोग सहकारी संस्था कायदा आणि बँकेचे पोटनियम यातील तरतुदीस अनुसरून खालीलप्रमाणे करावा अशी शिफारस केलेली आहे. त्यास आपण सर्वांनी मंजूरी द्यावी ही विनंती.