स्थापना

आपल्या बँकेचे सर्व सभासद, हितचिंतक, ग्राहक व कर्मचार्‍यांच्या सहकार्याने दिवसेंदिवस इगतपुरी तालुका परिसर, नाशिक जिल्ह्यात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढत असुन, जनमानसातील विश्‍वास कायम ठेवण्यास आपली बँक पात्र ठरली आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काची एक बँक असावी व बँकेच्या माध्यमातुन इगतपुरी तालुक्यातील व नाशिक जिल्ह्यातील सभासद, ग्राहक, हितचिंतक यांचे जीवनमान समृद्ध करावे आणि त्यातूनच एका सशक्त समाजाची निर्मिती व्हावी या उदात्त ध्येयाने बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. किसनलालजी पिचा व सहकारमहर्षी स्व. मुळचंदजी गोठी , स्व. धुलचंदजी चोरडिया, स्व. कांतीलालजी शहा, स्व. हिरालालजी शहा, स्व. जगन्नाथजी सुंठवाल, स्व. काशिनाथजी वालझाडे, स्व. पांडुरंगजी कडू व श्री. नन्दलाल रामबगस चांडक या सर्व सहकार्‍यांनी सन 1961 मध्ये बँकेची घोटी येथे स्थापना केली आहे.
बँकेच्या प्रगतीसाठी झटणे हा त्याचा श्‍वास होता. त्यांचा बँकेत नित्यनेमाने येण्याचा शिरस्त होता. बँकेचे दैनंदिन कार्य सुरळीत चालु राहण्यासाठी ते वेळोवेळी जागरुकतेने मार्गदर्शन करत असत. त्यांच्या स्मृती, त्यांची शिकवण आणि त्यांची ध्येयनिष्ठाच आम्हा संचालक मंडळाला वेळोवेळी मार्गदर्शक ठरत आहे. बँकेची आर्थिक स्थितीवर्षात सर्व स्थरावर उल्लेखनीय प्रगती झालेली आहे. बँकेच्या उद्दिष्टांप्रमाणे बँकेच्या ठेवीमध्ये, कर्जामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बँकेच्या संचालक मंडळाने संपूर्ण निर्णय एकमताने घेऊन गुणात्मक दर्जा कायम ठेवून संख्यात्मक प्रगती केलेली आहे.