आरटीजीएस / एनईएफटी / कर विवरणी

आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) आणि एनईएफटी ( नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर ) सुविधे अंतर्गत, ग्राहक आमच्या बँकेतून इतर बँकांमध्ये निधी हस्तांतर (रक्कम वर्ग) करु शकतो. आरटीजीएस माध्यमातून ग्राहक किमान रक्कम 2 लाख वर्ग करू शकतो, तसेच एनईएफटी अंतर्गत रक्कम वर्ग करण्यासाठी किमान रकमेचे बंधन नाही.

रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक सुचने अंतर्गत, आरटीजीएस तसेच एनईएफटी मार्फत लाभधारकाच्या खात्यात जमा करण्यात येणारी रक्कम ही, लाभार्थी खाते क्रमांकावर आधारित असेल. त्यामुळे मूळ व्यवहार करणाऱ्या व्यक्तीने योग्य लाभार्थी खाते क्रमांक निधी हस्तांतरण अर्जात लिहिला गेला आहे,याची खात्री करणे आवश्यक आहे. ग्राहकाने स्वतःचा खाते क्रमांक तसेच लाभार्थीचा बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड आणि रक्कम योग्यरित्या नमूद करणे आवश्यक आहे.