थकबाकी

बँकेच्या कर्जाची थकबाकी म्हणजे बँकेच्या प्रगतीमधील मोठा अडसर आहे. त्यासाठी सभासदांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड ही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. कर्जदार सभासदांनी आपली पत व दर्जा वाढावा यासाठी दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड करणे क्रमप्राप्त ठरते. 2015-2016 वर्षी एकूण 195 सभासदांकडून रूपये 183.36 लाख इतकी थकबाकी येणे आहे. कर्जाशी थकबाकीचे शेकडा प्रमाण 9.62% इतके आहे.

बँकेच्या कर्जदारांना व त्यांच्या जामिनदारांना नम्र विनंती की, त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड नियमित करावी व आपले खाते थकबाकीत व एन.पी.ए. मध्ये जाणार नाही, याची दक्षता घ्यावी जेणे करून आपल्याकडून वसुल झालेल्या रकमेतून, इतर सभासद बांधवांना सुद्धा कर्ज मिळण्याची सोय उपलब्ध करून देता येईल व बँकेच्या प्रगतीस आपले सहकार्य लाभेल.