सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काची एक बँक असावी व बँकेच्या माध्यमातुन इगतपुरी तालुक्यातील व नाशिक जिल्ह्यातील सभासद, ग्राहक, हितचिंतक यांचे जीवनमान समृद्ध करावे आणि त्यातूनच एका सशक्त समाजाची निर्मिती व्हावी या उदात्त ध्येयाने बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. किसनलालजी पिचा व सहकारमहर्षी स्व. मुळचंदजी गोठी, स्व. धुलचंदजी चोरडिया, स्व. कांतीलालजी शहा, स्व. हिरालालजी शहा, स्व. जगन्नाथजी सुंठवाल, स्व. काशिनाथजी वालझाडे, स्व. पांडुरंगजी कडू व श्री. नन्दलाल रामबगस चांडक या सर्व सहकार्यांनी सन 1961 मध्ये बँकेची घोटी येथे स्थापना केली आहे. बँकेचे सर्व सभासद, हितचिंतक, ग्राहक व कर्मचार्यांच्या सहकार्याने दिवसेंदिवस इगतपुरी तालुका परिसर, नाशिक जिल्ह्यात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढत असुन, जनमानसातील विश्वास कायम ठेवण्यास बँक पात्र ठरली आहे. बँकेची त्र्यंबकेश्वर येथे दुसरी शाखा असून तिसरी शाखा गोंदे (दुमाला) येथे दि. 30/11/2015 पासून कार्यान्वित झाली असून खातेदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याप्रमाणे बँकेने नॅशनल क्लिअरिंग सेंटर, रिझर्व बँक ऑफ इंडिया, मुंबई यांचेकडुन स्पेशल मायकर कोड नंबर घेऊन मायकर चेकची सुविधा खातेदारांचे नाव व खातेनंबर टाकून कार्यान्वित केलेली आहे.